पतना न्यावें जिहीं – संत निळोबाराय अभंग – १११२
पतना न्यावें जिहीं दोषीं ।
कीर्तनीं तयांसी हा रस ॥१॥
जैसें बीज भाजल्याअंतीं ।
नुगवेचि शेतीं पेरिल्य ॥२॥
तैशीं जळती कर्माकर्मे ।
एका हरिनामें गर्जतां ॥३॥
निळा म्हणे श्रोता वक्ता ।
होती उभयतां शुचिर्भूत ॥४॥