संत निळोबाराय अभंग

कां जी कृपावंत झालेति – संत निळोबाराय अभंग – १११९

कां जी कृपावंत झालेति – संत निळोबाराय अभंग – १११९


कां जी कृपावंत झालेति निष्ठूर ।
नाईका उत्तर करुणेचें ॥१॥
काय अजामेळा होती पुण्यरासी ।
नेला वैकुंठासी नामोच्चारें ॥२॥
गणिका ते वेश्या काय आचरली ।
राम म्हणतां नेली निजधामा ॥३॥
जराव्याधें पायीं विधीयला बाण ।
तो तुम्ही आपण तारियेला ॥४॥
निषाद तो कोळी श्रीरामासन्मुख ।
येतां दिलें सुख निवविला ॥५॥
पूतना ते पाजी विष स्तनपानीं ।
ते सायोज्यसदनीं बैसविली ॥६॥
गजेंद्र तो काय तप आचरला ।
धांवा म्हणतां नेला सोडवुनी ॥७॥
वैरियाचा बंधु केला लंकापती ।
चिरंजीव पध्दती बैसउनी ॥८॥
निळा म्हणे माझा नाहीं पुरविला ।
हेतचि राहिल दर्शनाचा ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कां जी कृपावंत झालेति – संत निळोबाराय अभंग – १११९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *