संत निळोबाराय अभंग

गेलेती आपुल्या ब्रिदातें – संत निळोबाराय अभंग – ११२१

गेलेती आपुल्या ब्रिदातें – संत निळोबाराय अभंग – ११२१

गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी ।
ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥
येरवी ऐकोनि धांवतसां धांवा ।
तें आजि केशवा काय झालें ॥२॥
आटाहास्य तुम्हां मारितां आरोळी ।
नाईकाची टाळी बैसउनी ॥३॥
निळा म्हणे माझें कर्म आलें आड ।
न चलेचि कैवाड तुमचा देवा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गेलेती आपुल्या ब्रिदातें – संत निळोबाराय अभंग – ११२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *