संत निळोबाराय अभंग

जया जो वाटां भागा – संत निळोबाराय अभंग – ११२४

जया जो वाटां भागा – संत निळोबाराय अभंग – ११२४

जया जो वाटां भागा आला ।
पाहिजे केला जतन तोचि ॥१॥
आम्हीं कराव्या पापराशी ।
निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥
लोहें न संडितां लोहपणा ।
परिसें तत्‍क्षणा पालटावें ॥३॥
निळा म्हणे अंधार निशीं ।
रवी त्या प्रकाशी निजतेजें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जया जो वाटां भागा – संत निळोबाराय अभंग – ११२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *