संत निळोबाराय अभंग

लाजविली सेवा लाजाविली – संत निळोबाराय अभंग – ११४४

लाजविली सेवा लाजाविली – संत निळोबाराय अभंग – ११४४


लाजविली सेवा लाजाविली भक्ति ।
वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥
ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग ।
हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥
आमुचें होणार तेंचि वाढविलें ।
तुमचें कीर्ति आलें हीनपण ॥३॥
कैसे दीनानाथ म्हणवाल जी आतां ।
आम्हां उपोक्षितां अनाथांसी ॥४॥
शिणलों भागलों संसारें गांजिलों ।
म्हणोनियां आलों शरण तुम्हां ॥५॥
निळा म्हणे काय जाणोनि नेणते ।
झालेति यशातें दवडूनियां ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लाजविली सेवा लाजाविली – संत निळोबाराय अभंग – ११४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *