संत निळोबाराय अभंग

उष्में न तपेचि सुधाकर – संत निळोबाराय अभंग – १२०३

उष्में न तपेचि सुधाकर – संत निळोबाराय अभंग – १२०३

उष्में न तपेचि सुधाकर ।
सीतें न पीडे वैश्वानर ॥१॥
तेंवि हरिभक्तांतें हरी ।
नेदी बुडों भवसागरीं ॥२॥
गगन न पडे सतंभेविण ।
तान्हा न फुटेचि जीवन ॥३॥
निळा म्हणे उदया येतां ।
न देखे अंध:कारातें सविता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उष्में न तपेचि सुधाकर – संत निळोबाराय अभंग – १२०३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *