संत निळोबाराय अभंग

यावरी आपण वृक्षातळीं – संत निळोबाराय अभंग – १२१

यावरी आपण वृक्षातळीं – संत निळोबाराय अभंग – १२१


यावरी आपण वृक्षातळीं ।
जाऊनियां वरी न्याहाळि ।
तंव ते म्हणती अरे वनमाळी ।
आतुर बुध्दि करुं नको ॥१॥
येथे हा आघाताचा ठावो ।
नेणसि तूं त्याचा भावो ।
अणुमात्र निसरतां पावो ।
होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥
आपुला घात दुर्जना हरीख ।
हें तों न करीतीं मूर्ख देख ।
तुज पुढें तों शाहणे आणिक ।
नाढळेंचि ये भुवनत्रयीं ॥३॥
नायकोनियां आमुच्या उत्तरा ।
व्यर्थचि वेचावें आत्मशरीरा ।
दु:खी करुनि मातापितरां ।
समागमिया देशवटा ॥४॥
ऐसा विचार होईल हरी ।
नको चढो या वृक्षावरी ।
ठेवितों तुझया पायांवरी ।
आम्ही सकळहि मस्तक ॥५॥
परीं तें नायकोनियां कृष्ण ।
चढला वरी बैस जाऊन ।
तया म्हणती अवघे जण ।
करीं हो सावधानपणें कार्य ॥६॥
तयांप्रति बहु बरें म्हणे ।
जाणता त्रैलोक्याचे खुणे ।
निळा म्हणे चरित्र करणें ।
आहे दाखवणें तेंचि करी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी आपण वृक्षातळीं – संत निळोबाराय अभंग – १२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *