संत निळोबाराय अभंग

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें – संत निळोबाराय अभंग – १२१४

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें – संत निळोबाराय अभंग – १२१४


ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें ।
पाचारिलें ज्या ज्या आर्थे ।
तुम्ही जाउनियां तेथें ।
साह्य केलें श्रीहरी ॥१॥
आर्तें गजेद्राचें स्तवन ।
ऐकतांचि पदाभिगमन ।
करुनियां त्याची अर्ति हरण ।
निजधामाप्रती पाठविला ॥२॥
जिज्ञासता जनका अंगीं ।
तुमचे जाणवयालागीं ।
त्यासि ज्ञान देऊनियां विषय भोगीं ।
विदेही करुनि ठेविला ॥३॥
अर्थार्थी तो विभीषण ।
त्यासि लंकापति करुनि पूर्ण ।
स्थापिला चिरंजीवपद देऊन ।
अर्थदान त्या दीधलें ॥४॥
शुकसनकादिक ज्ञानें ।
अनुसरले आत्माचिंतनें ।
त्यासि देऊनियां निजात्मज्ञान ।
जीवन्मुक्तपदीं बैसविलें ॥५॥
चतुर्विधा मुक्ति चारी भक्त ।
तुमचे कृपें परम मुक्त ।
उपमन्या क्षुधार्ती आळवीत ।
तया क्षीरसिंधु दिधला ॥६॥
ध्रुवें केलें तुमचें स्तवन ।
मागें बैसावया निजस्थान ।
तयातें ध्रुवपदीं बैसवून ।
केला वरिष्ठ सकळांसी ॥७॥
सुदाम देव तो लाचारी ।
तीनचि मुष्टी पोहे हरी ।
तेचि घालुनियां मुखाभीतरीं ।
सुवर्ण नगरी दिधली त्या ॥८॥
स्तंभी प्रल्हाद पाचारी ।
तत्काळ प्रगटोनियां नरहरि ।
हिरण्यकश्यपातें विदारी ।
आणि कुरवाळी निजभक्तां ॥९॥
निळा म्हणे ऐशी कीर्ति ।
केली चरित्रें श्रीपती ।
अपार हरिभक्तां अपार हस्तीं ।
अपार दिधलीं वरदानें॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें – संत निळोबाराय अभंग – १२१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *