संत निळोबाराय अभंग

मग पाचारुनियां प्रांतवासी – संत निळोबाराय अभंग – १२४

मग पाचारुनियां प्रांतवासी – संत निळोबाराय अभंग – १२४


मग पाचारुनियां प्रांतवासी ।
व्दिज आणिले भोजनासी ।
जिताणें करुनियां श्रीकृष्णासी ।
ओंवाळिती अक्षवाणें ॥१॥
काळया सर्प स्थपिला वरी ।
कळंबातळीं यमुने तिरीं ।
देखोनि सोहळा तो नरनारी ।
करितीं आश्चर्य मानसीं ॥२॥
पहा रे हें श्रीकृष्णचरित्र ।
एकाहुनि एक विचित्र ।
नवलचि देखती आमुचें नेत्र ।
नित्यानित्य नूतन ॥३॥
हेचि घरोघरीं वार्ता ।
कथिती कृष्णचरित्र कथा ।
गुढीया उभवूनीयां चित्ता ।
माजी हर्ष न समाय ॥४॥
गाती नित्य नामावळी ।
तुळसी वृंदावना बैसोनि पाळी ।
अवलोकूनियां मुर्ति सावळी ।
करिती जिवें कुरवंडिया ॥५॥
म्हणती आमुचें थोर भाग्य ।
भाग्यें जोडला हा श्रीरंग ।
याचा नित्य घडतां संग ।
काय करावें वैकुंठ ॥६॥
निळा म्हणे उत्साह ऐसा ।
मानूनियां निज मानसा ।
करिती पूजा स्तविती ईशा ।
जगत्रयाच्या श्रीकृष्णा ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग पाचारुनियां प्रांतवासी – संत निळोबाराय अभंग – १२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *