संत निळोबाराय अभंग

सप्त अहोरात्र होतां – संत निळोबाराय अभंग – १२३

सप्त अहोरात्र होतां – संत निळोबाराय अभंग – १२३


सप्त अहोरात्र होतां ।
तेथें कृष्ण जळाअतोंता ।
सांगतां युध्दाची ते वार्ता ।
सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥
बोलिला उदंड विरुध्द वचनें ।
युध्दहि केलें अति सत्राणें ।
परी या त्रैलोक्यजीवनें ।
लाविली दोरी तया नाकीं ॥२॥
मग धरुनियां तें करीं ।
केलें नृत्य पृष्ठीवरी ।
सवेंचि आणिला बाहेरी ।
आपण वरी बैसोनियां ॥३॥
देखोनियां अवघे गडी ।
हर्षें नाचती बागडी ।
घेऊनियां गोकुळां गुढी ।
जाणविली वार्ता सकळांसीं ॥४॥
ऐकतां हर्षले नागरिक ।
सामोरे आले ते सकळिक ।
देखोनियां यदुनायक ।
लोटांगणें घालिती ॥५॥
देऊनियां आंलिगणे ।
कृष्णें हरिला त्यांचा शीण ।
मग समागमें अवघे जण आले ।
कृष्णमंदिरां ॥६॥
गाई वत्सां आणि गोवळां ।
आनंद नरनारी बाळां ।
झाला ब्रम्हानंद सकळां ।
म्हणे निळा म्हणे हरिभेटी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सप्त अहोरात्र होतां – संत निळोबाराय अभंग – १२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *