संत निळोबाराय अभंग

भक्त पहावया तांतडी – संत निळोबाराय अभंग – १२५३

भक्त पहावया तांतडी – संत निळोबाराय अभंग – १२५३


भक्त पहावया तांतडी ।
नामचि ऐकोनि घाली उडी ।
निजदासाचीं सांकडीं ।
न देखे नाईके सर्वथा ॥१॥
ऐसा भक्तां ऋणाईत ।
सर्वदा सेवेसी तिष्ठत ।
मागें पुढें सांभाळित ।
त्यांच्या प्रेमासी भुलला ॥२॥
गजेंद्रा संकटीं सोडविलें ।
इच्छित उपमन्या दीधलें ।
ध्रवासी नेऊनियां स्थापिलें ।
गगणीं बैसविलें अढळपदीं ॥३॥
गणिका पक्षियातें वोभातां ।
घालूनि विमानी ते तत्वतां ।
नेली वैकुंठासी त्वरितां ।
निज भुवनीं सन्मानिली ॥४॥
तैसाचि पुंडलिकासाठीं ।
उभाचि इटेच्या नेहटी ।
युगें गेली परि हा गोठी ।
न करीची कदाही वैकुंठींची ॥५॥
बळीचा झाला व्दारपाळ ।
यशोदे नंदाचा हा बाळ ।
कंसचाणूरादिकां काळ ।
सारथी कृपाळ अर्जुनाचा ॥६॥
धर्मा घरीं तरी हा मंत्री ।
विवेक युक्ती प्रमाण सूत्रीं ।
गुण लावण्याचा धात्री ।
विचार सांगे सवहिताचा ॥७॥
भीष्म द्रोणाचा हा प्राण ।
सांगती विदुराचा भगवान ।
दौपदी लज्जेचें निवारण ।
वस्त्रें अपार पुरविलीं ॥८॥
निळा म्हणे भक्तासाठीं ।
नित्य करुणा वाहे पोटीं ।
शंखचक्रादि आयुधें मुष्टी ।
भक्तारक्षण्‍ करावया ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त पहावया तांतडी – संत निळोबाराय अभंग – १२५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *