संत निळोबाराय अभंग

हातीं चक्र सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – १२५६

हातीं चक्र सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – १२५६


हातीं चक्र सुदर्शन ।
वागवितां न मनीं त्याचा शीण ।
आपुल्या भक्तांचे रक्षण ।
आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥
भक्तस्तवनीं ठेविेले कान ।
भक्तांपाशीं जीवप्राण ।
भक्तांकडे लाविलें मन ।
कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥
नेणे भक्तांविण आणिक ।
करी दास्य होउनी सेवक ।
त्यांचे वचनाचें कौतुक ।
श्रवणीं मिरची भूषणें ॥३॥
भक्त पाहनि वाडेंकोडे ।
होऊनि ठाके तेचि पुढें ।
भक्त वनिती जे पवाडे ।
ऐके निवाडे बैसोनी ॥४॥
त्यांचि वचनें स्तवनमाळा ।
आवडी मिरवी आपुल्या गळां ।
त्यासि अवलोकितां डोळां ।
झाला देखण सर्वांगे ॥५॥
भक्तांच्या नामें नामांकित ।
त्यांचिया क्रिया कर्मे करित ।
त्यांचिया रुपें रुपमंडित ।
झाला भगवंत भक्तसुखें ॥६॥
निळा म्हणे भक्तांचिसाठीं ।
नाना स्वरुपें नटला नटीं ।
नाना अवतार त्यांचिये संकटी ।
नाना नामें धरियेलीं ॥७॥राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हातीं चक्र सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – १२५६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *