संत निळोबाराय अभंग

अगाध कीर्ति वाढले संत – संत निळोबाराय अभंग – १२५७

अगाध कीर्ति वाढले संत – संत निळोबाराय अभंग – १२५७

अगाध कीर्ति वाढले संत ।
केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥
अग्नींत उभे विषचि प्याले ।
नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥
वंदूनि आज्ञा बोले पशु ।
करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥३॥
निळा म्हणे ठेऊनि उदकीं ।
कागदहि सेखीं कोरडया वह्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अगाध कीर्ति वाढले संत – संत निळोबाराय अभंग – १२५७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *