संत निळोबाराय अभंग

आणिकातेंही विठ्ठल करिती – संत निळोबाराय अभंग – १२६५

आणिकातेंही विठ्ठल करिती – संत निळोबाराय अभंग – १२६५

आणिकातेंही विठ्ठल करिती ।
लागले संगती भाविक त्या ॥१॥
यांचा वारा लागेल ज्यासी ।
येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥
घडतां त्यांचें अवलोकन ।
होती पावन महा पापी ॥३॥
निळा म्हणे त्यांची भेटी ।
तेचि गांठी विठठलेचि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिकातेंही विठ्ठल करिती – संत निळोबाराय अभंग – १२६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *