संत निळोबाराय अभंग

यात्रा फिरोनियां माघारी – संत निळोबाराय अभंग – १२८

यात्रा फिरोनियां माघारी – संत निळोबाराय अभंग – १२८


यात्रा फिरोनियां माघारी ।
आली गोकुळाभीतरी ।
उव्देग करिती घरोघरीं ।
म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥
इंद्र कोपलियावरी ।
अणुमात्रही वृष्टी न करी ।
बरग पाडूनियां दारीं ।
उरों नेदील शेंपूट ॥२॥
अनावृष्टी नव्हतां पीक ।
मरती दुष्काळें पिडती लोक ।
अथवा अतिवृष्टी करुनी सकळिक ।
बुडवील निमिषार्धे ॥३॥
भयचि अणुमात्र न वाटे कृष्णा ।
परि हा कोपलिया देवराणा ।
करील नाश एक क्षणा ।
पळमात्रही न लगतां ॥४॥
हें असो भक्षिला गोरस ।
तुप्ती सांडी उदगारास ।
वांकुल्याही गोवर्धनास ।
कृष्ण म्हणे रे दाखवा ॥५॥
हें इंद्र देखोनियां दृष्टीं ।
क्रोधें संतप्त झाला पोटीं ।
मेघा पाचारुनियां म्हणे वृष्टी ।
करा निर्घारें गोकुळावरी ॥६॥
पाचारुनि संवर्तका ।
म्हणे गोकुळीची नुरवीं मृत्तिका ।
मुसळधारीं वषोंनी उदका ।
मेळवीं नेउनी सागराच्या ॥७॥
येरु म्हणे बहुत बरें ।
आज्ञा केली ते सुरस्वरें ।
करीन परी एक दुसरें ।
पाहिजे मज साह्यार्थ ॥८॥
दयावा सवें प्रचंड वात ।
करावया गोकुळाचा घात ।
इंद्रे पाचारुनियां त्यातें त्वरित ।
म्हणे जावें याच्या संगे ॥९॥
निळा म्हणे स्वमुखें त्यासी ।
सांगे जाउनी गोकुळासी ।
मोडूनियां तेथचिया वृक्षांसी ।
घरां खोपटांसी उडवावें ॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यात्रा फिरोनियां माघारी – संत निळोबाराय अभंग – १२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *