संत निळोबाराय अभंग

संवर्तक वर्षेल जळधारीं – संत निळोबाराय अभंग – १२९

संवर्तक वर्षेल जळधारीं – संत निळोबाराय अभंग – १२९


संवर्तक वर्षेल जळधारीं ।
तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी ।
पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥
आज्ञा होतांचि चालिले मेघ ।
पवन त्याही पुढें सवेग ।
तेणें अभ्रें दाटली अनेक ।
पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥
विजुवा चमकती लक्षवरीं ।
कलपांत काळींच्या जैशा हारी ।
देखोनियां गजबज भारी ।
झाली गोकुलीं सर्व जनां ॥३॥
म्हणती कालिचि याची इंद्रपुजे ।
विश्रवंसिलें या नंदात्मजें ।
तेणेचिं क्षोभोलियां सहस्त्रांबुजे ।
मेघ धाडिले गर्जती ॥४॥
आतां जावें कोणीकडे ।
पळोनियां देवक्षोभापुढें ।
अकस्मात अरिष्ट हें एवढें ।
आणिलें कृष्णें आम्हांवरी ॥५॥
मागिल्या अरिष्टांत वांचला ।
तेणेंचि बहूत वेळ घेतला ।
घात आमुचा येणें केला ।
गाईगोवळा समवेत ॥६॥
तंव सुटला झुंजात वारा ।
मेघें घातल्या सरळ धारा ।
निळा म्हणे नंदकुमरा ।
करणें त्याचा अवमान ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संवर्तक वर्षेल जळधारीं – संत निळोबाराय अभंग – १२९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *