संत निळोबाराय अभंग

मग म्हणे गडियां – संत निळोबाराय अभंग – १३०

मग म्हणे गडियां – संत निळोबाराय अभंग – १३०


मग म्हणे गडियां आपण ।
उचलूं चला गोवर्धन ।
तयातळीं सकळही जन ।
घालुनियां संरक्षूं ॥१॥
मग ते उभे करुनि फेरी ।
धरविला त्यांचे हातें गिरी ।
आपणही तेथें निमित्यावरी ।
एकी आंगोळी लावियली ॥२॥
हाका देऊनि उचलीती ।
येकचि हिल्लारी करा म्हणति ।
उर मस्तक नेटीं लाविती ।
एक पाठी देती निजबळें ॥३॥
एक पडोनियां उचलिती पाय ।
एक म्हणती न धरा रें भय ।
एक उभे राहती ठायाठाय ।
कृष्ण बळिया आमुचा ॥४॥
तंव तो अनंतकोटीब्रम्हांडाधीश ।
परमात्मा हा कृष्ण परेश ।
विश्रवलाघवी परमपुरुष ।
न करी तें काय स्वलीला ॥५॥
आपोआप चालिला वरी ।
अंतरिक्षाची निज सत्ता गिरी ।
धरुनि सकळांते हाकारी ।
म्हणे वसा तळीं याचीये ॥६॥
आपभयेंचि धांवलीं सकळें गाई गौळणी आणि गोवळे ।
निळा म्हणे श्रवापदें पक्षीकूळें ।
मुंगीया आदीकरुनी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग म्हणे गडियां – संत निळोबाराय अभंग – १३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *