संत निळोबाराय अभंग

गोड तुझी ब्रीदावळी – संत निळोबाराय अभंग – १३०३

गोड तुझी ब्रीदावळी – संत निळोबाराय अभंग – १३०३


गोड तुझी ब्रीदावळी ।
गोड गातां नित्यकाळीं ।
गोड भक्त भावें बळी ।
तूं वनमाळी त्यापाशीं ॥१॥
गोड तुमचीं नामें गाती ।
गोड कीर्तनीं उभे ठाकती ।
गोडा गोड तूं श्रीपती ।
त्याची भुक्ति मुक्ति तूंचि तूं ॥२॥
गोड त्याचे स्वानुभव ।
तुमच्या पायी ठेविला जीव ।
गोड भक्ति दृढभाव ।
तुमच्या चरणीं लिगटले ॥३॥
गोड त्याचें याती कुळ ।
गोड सत्कर्म तें सोज्वळ ।
गोड त्याचें बुध्दीबळ ।
तुज धरिलें निश्चयें ॥४॥
निळा म्हणे त्यांची मती ।
गोड कीर्तनीं नवी स्फूर्ती ।
गोड तुमची सगुण मूर्ती ।
ह्रदयीं त्याचे स्थिरावली ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोड तुझी ब्रीदावळी – संत निळोबाराय अभंग – १३०३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *