संत निळोबाराय अभंग

नाठवीता स्वयें दयावी आठवण – संत निळोबाराय अभंग – १३३४

नाठवीता स्वयें दयावी आठवण – संत निळोबाराय अभंग – १३३४

नाठवीता स्वयें दयावी आठवण ।
ते तों आहे खूण सद्गुरुची ॥१॥
ऐशिया प्रकारें बोधवितां शिष्या ।
अंतरीं प्रकाशा काय उणें ॥२॥
आपुलें स्वराज्य फावें आपणांसीं ।
नित्य सदभ्यासीं तद्रूपता ॥३॥
निळा म्हणे ऐशी सद्गुरुपें कळा ।
परी आहे विरळा बोधक तो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाठवीता स्वयें दयावी आठवण – संत निळोबाराय अभंग – १३३४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *