संत निळोबाराय अभंग

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले – संत निळोबाराय अभंग – १३९०

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले – संत निळोबाराय अभंग – १३९०

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले ।
हरीचि होउनी ठेले एकाएकीं ॥१॥
आप पर तया न दिसेचि पाहतां ।
विश्वीं एकात्मता अवलोकीती ॥२॥
काम क्रोध लोभ मोह ममता माया ।
पळताती देखोनियां आशा तृष्णा ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या दर्शनेंचि मुक्त ।
होताती पतीत महापापी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले – संत निळोबाराय अभंग – १३९०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *