संत निळोबाराय अभंग

दळणीं दळीतां आठवे मानसीं – संत निळोबाराय अभंग – १४१०

दळणीं दळीतां आठवे मानसीं – संत निळोबाराय अभंग – १४१०

दळणीं दळीतां आठवे मानसीं ।
अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥
वोविया मंगळी गाईन तयासी ।
स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥
एकाजनार्दन आणि नामदेव ।
देति स्वानुभव आठवितां ॥३॥
परलोकसोईरे जिवलग हे माझो ।
जें का पंढरिराजे अनुग्रहीले ॥४॥
निळा म्हणे संत जे जे भूमंडळीं ।
त्यांची पायधुळी वंदीन मी ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दळणीं दळीतां आठवे मानसीं – संत निळोबाराय अभंग – १४१०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *