संत निळोबाराय अभंग

संतसंगें हरे पाप – संत निळोबाराय अभंग – १४१६

संतसंगें हरे पाप – संत निळोबाराय अभंग – १४१६


संतसंगें हरे पाप ।
संतसंगे निरसे ताप ।
संतसंगे निर्विकल्प ।
होय मानस निश्चळ ॥१॥
संतसंगे वैराग्य घडे ।
संतंसगे विरक्ती जोडे ।
संतसंगे निजशांति वाढे ।
साधन ह्रदयीं अखंडित ॥२॥
संतसंगे हरिची भक्ति ।
संतसंगें ज्ञानविरक्ति ।
संतसंगें भुक्तिमुक्ती ।
साधकां वरिती अनायासें ॥३॥
निळा म्हणे साधुसंगे ।
महाभाग्याचें हें भाग्य ।
सेविती ते स्वरुप चांग ।
पावती आत्मया श्रीहरीचें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतसंगें हरे पाप – संत निळोबाराय अभंग – १४१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *