संत निळोबाराय अभंग

ऐसें बोलोनियां ते – संत निळोबाराय अभंग – १६२

ऐसें बोलोनियां ते – संत निळोबाराय अभंग – १६२


ऐसें बोलोनियां ते उन्मत ।
ठोक फोडिले सक्रोधयुक्त ।
आले सन्मुखचि धांवत ।
कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥
त्यां देखोनियां बळिराम ।
आणि हासोनी बोलती मेघ:श्याम ।
तुम्ही करुं आलेती संग्राम ।
तरी निरऊनियां स्त्रियां बाळां ॥२॥
आजिवरी भोगिलिया संपत्ती ।
त्याच्या संगे सुख विश्रांती ।
त्यांसी न पुसतां जाणें अंतीं ।
महापंथी हें उचित नव्हे ॥३॥
कंसारायाचें वैभव ।
भोगिलें चिरकाळवरी सर्व ।
त्याचिये काजीं वेचितां जीव ।
पावाल स्वयमेव उत्तम गती ॥४॥
परी एक सांगतों विचार ।
संग्रामीं न सांडावा धीर ।
जें जें वसउनियां शरीर ।
असेल विदया ते ते दावा ॥५॥
बहुत वल्गना आतां ।
वस्तादातें न पुसतां ।
यावरी तरी निश्रचळ चित्ता ।
करुनियां आठवा तयातें ॥६॥
निळा म्हणे बोलोनी ऐसें ।
युध्दीं उठावले सरिसे ।
मातंगा देखोनियां जैसे ।
सिंह पाडे भुकाळू ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसें बोलोनियां ते – संत निळोबाराय अभंग – १६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *