संत निळोबाराय अभंग

मेळवितांचि हातीं हात – संत निळोबाराय अभंग – १६३

मेळवितांचि हातीं हात – संत निळोबाराय अभंग – १६३


मेळवितांचि हातीं हात ।
आसुडिले ते अकस्मात ।
हें देखोनियां लोक समस्त ।
ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥
एक एका धरितीं करीं ।
दाविती चिकाटियाच्या परी ।
दंडिमुडपी उरीं शिरीं ।
मारिती धडका परस्‍परें ॥२॥
पायीं पाय आडवे तिडवे ।
गाउनी दाविती शक्तिवैभवें ।
वज्र मिठियाचीं लाघवें दाविती सुहावे येरयेरां ॥३॥
कोणिचि नाटोपती कोणा ।
चक्राकार भेदिती खुणा ।
रगा लाविती चाऊनि दर्शना ।
आक्रोशें माना मुरगाळिती ॥४॥
शेंडया उपटूनियां सांडिती ।
घे घें म्हणोनियां झोंबती ।
येरयेरां पृष्ठीवरी ताडिती ।
मिठिया घालिती येरयेरां ॥५॥
एक वरदी एक ईश्वर ।
उभया युध्दाचा परिचार ।
परी लाघविया हा सारंगधर ।
आणि बळिराम अवतारिया ॥६॥
निळा म्हणे वर्मभेदका ।
पुढें कवणाचा आवांका ।
पाहोनी मृत्युकाळ नेटका ।
उपटूनि भूमितें त्राहाटिलें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मेळवितांचि हातीं हात – संत निळोबाराय अभंग – १६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *