संत निळोबाराय अभंग

नाकीं तोंडी वाहे रुधिर – संत निळोबाराय अभंग – १६४

नाकीं तोंडी वाहे रुधिर – संत निळोबाराय अभंग – १६४


नाकीं तोंडी वाहे रुधिर ।
हातापायांचा झाला चूर ।
मस्तक मेंदु उसळे बाहेर ।
मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥
तया देऊनि उतम गती ।
आनंदें बळरामश्रीकृष्ण्‍ नाचती ।
तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥
मोहित होऊनियां नारी नर ।
अवलोकिती बळिराम आणि श्रीधर ।
परम सुंदरा सुंदर ।
नागरा नागर भुलवणें ॥३॥
अवलोकिती कृष्णाकृती ।
लवोंचिं विसरलीं नेत्रपातीं ।
बळिराम देवाचीही मूर्ती ।
राजस सुकुमार त्याचिपरी ॥४॥
अंगी यशाचें गौरव ।
रुप लावण्याची ठेव ।
पहातां नयनां न पुरे हांव ।
मना स्वयमेव तेंचि होणें ॥५॥
यापरी तटस्थ् सकळां ।
लागले नरनारी बाळा ।
तेणें बहमानंद सुकाळा ।
झाली अधिकारी भोगिती ॥६॥
निळा म्हणे यावरी रावो ।
पावेल मुक्तीचा गौरवो ।
सोलीव सुखाचा स्वानुभवो ।
समर्पील कृष्णा तयासी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाकीं तोंडी वाहे रुधिर – संत निळोबाराय अभंग – १६४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *