संत निळोबाराय अभंग

नव्हते एक ना दुसरें – संत निळोबाराय अभंग – १७२

नव्हते एक ना दुसरें – संत निळोबाराय अभंग – १७२


नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी ।
होता लपोनिया आपुलीये कुसीं ।
कांहिंचि नाळखुनि आपआपणासि ।
तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥
रुप धरिलें सगुण चांगलें ।
ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें ।
चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें ।
मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥
नव्हता गांवसीव पहिला यासि कांही ।
नामरुपासि तो आधीची ठाव नाहीं ।
म्हणती वैकुंठ तें कालिची जालें बाई ।
क्षीरसागर ना कैंचि शेषशाई वो ॥३॥
नव्हता काळागोरा खुजा ना ठेंगणा ।
स्‍वरुपसुंदर ना आंधळा देखणा ।
कैंचि जीवशिव तयासी भावना ।
पंचभौतिक ना नेणें पंचप्राणा वो ॥४॥
नव्हता मन बुध्दि इंद्रियांचा मेळा ।
कार्यकर्तृत्व हा कारण वेगळा ।
येणें जाणें यासी नव्हतें कवण्या काळा ।
तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥५॥
यासी जीवेंभावें धरा घाला मिठया ।
ऐशा बोलती गौळणी गोरटया ।
निळा म्हणे अवघ्या मिळोनि लहानामोठया ।
यासि चुकती त्या अभाग्या करंटया वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नव्हते एक ना दुसरें – संत निळोबाराय अभंग – १७२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *