संत निळोबाराय अभंग

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर – संत निळोबाराय अभंग – १७१

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर – संत निळोबाराय अभंग – १७१


दिसे सगुण हा स्वरुपसुंदर ।
परि व्यापूनियां ठेला चराचर ।
देवादानचादि मानव असुर ।
याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥
ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती ।
रजनीं दिवो जयां याचीचि संगती ।
त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥
महि अंबु तेज मारुत गगन ।
जगा बीजरुप हाचि वो लपोन महदमायेचें हा अनादि कारण ।
देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान हो ॥३॥
आपुल्याचि गुणी ।
उरला भरोनियां चाही वाणी खाणी ।
ज्या परि हा तैसाचि साजणी ।
रुपें गुणे क्रिया मंडित भूषणीं वो ॥४॥
भुवनें चतुर्दश तींहि याच्या पोटीं ।
स्वर्गी एकविसाहि आदि हा शेवटीं ।
होण्या न होण्याच्या नेणोनियां गोठी ।
आपीं आपणचि एकट एकटी ॥५॥
निळा म्हणे आम्हीं नेणोनियां अबळा ।
हासों रुसों यासी करुं गदारोळा ।
खेळतां खेळ यासी भांडों वेळोवेळां ।
केले अपराध ते मागों या गोपाळा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर – संत निळोबाराय अभंग – १७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *