संत निळोबाराय अभंग

नित्यानंदा पुढे आनंद – संत निळोबाराय अभंग – १७३

नित्यानंदा पुढे आनंद – संत निळोबाराय अभंग – १७३


नित्यानंदा पुढे आनंद तो कोण ।
विषयसुख बाई बापुडें तें क्षीण ।
जेथें न सरेची वैकुंठसदन ।
शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥
नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें ।
घेऊं संगसुख हरीच्या सांगातें ।
गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें ।
हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥
नेघों समाधीचें सुख तुच्छ वाटे ।
नित्यनित्याचिये न पडों खटपटे ।
काय करुं ते तपाचे बोभाटे ।
एका हरिविण अवघी ते फलकटे वो ॥३॥
काय जाऊनियां करुं निजधामा ।
तेथें मी नातुडें नाडळें विश्रामा ।
येथें सांडूनियां तमालमेघ:शामा ।
नेघों नाईका आणिका दुर्गमा वो ॥४॥
स्वर्गभोग तेही न लागती असार ।
क्षणें होती जाती क्षणेंचि नैश्वर ।
येथें हरिसंगे क्रीडों निरंतर ।
सर्वही सुखांचे हा जोडला आगर वो ॥५॥
निळा म्हणे नित्य नि:सीम स्वानुभवें ।
ऐशा गोपिका त्या रंगल्या हरिसवें ।
अधिकाधिक् हें प्रेम त्यांचे नवें ।
जाणोनि आवडी ते पुरविली देवें वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नित्यानंदा पुढे आनंद – संत निळोबाराय अभंग – १७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *