संत निळोबाराय अभंग

मी मज माझें याची – संत निळोबाराय अभंग – १७४

मी मज माझें याची – संत निळोबाराय अभंग – १७४


मी मज माझें याची केली वो निरास ।
वीण आपणा येणें आणियेला त्रास ।
नेदी आड येऊं दुजियाचा आभास ।
कैसें काय करुं सांगा मज यास वो ॥१॥
ऐसें जाजावोनी बोले एक नारी ।
हरीचा सुखानंद भरुनी अंतरी ।
लटिकाची वालभाचा भाव लोकाचारीं ।
दाऊनि एकांतीं हरिसी काम सारी वो ॥२॥
म्हणे वृत्ति माझी नुरे देहावरीं ।
क्षणही न कंठे वो सासुरामाहेरीं ।
काय करुं मी वो न गमे घरदारीं ।
नेऊनी घाला जेथें अनंग मुरारी वो ॥३॥
यावरी गेलें आतां माझें माणुसपण ।
करितां उपचार ते हरिती माझे प्राण ।
गेलें होऊनियां होतें तें निर्माण ।
सोडा आस माझी दया वो मोकलून वो ॥४॥
ऐशीं देहगेहीं होऊनि उदास ।
गेले तुटोनियां अवघे आशापाश ।
निद्रा जागृती ना स्वप्नाचा आभास ।
एक लागला त्या हरीचा निजध्यास वो ॥५॥
निळा म्हणे नेणे आपपर दुसरें ।
भरली निजानंदी न पाहे माघारें ।
कैंचे येईल तेथें अविदयेचें वारें ।
झालें ह्रदयीं स्वानुभवचेईरें वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मी मज माझें याची – संत निळोबाराय अभंग – १७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *