संत निळोबाराय अभंग

यासी पाहतां वो हदयस्थ – संत निळोबाराय अभंग – १७६

यासी पाहतां वो हदयस्थ – संत निळोबाराय अभंग – १७६


यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला ।
यासि बोलतां वो वेदुचि घोकिला ।
यासि खेळतां कुसंगदोष गेला ।
यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो ॥१॥
ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी ।
आम्हीं लाधलों वो भाग्याच्या संसारी ।
नित्य आलिंगूं या हदयाच्या अंतरीं ।
ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥२॥
यासी विचारतां परमार्थ हातिं लागे ।
यासि विवरितां ये सिध्दांत वोळंगे ।
यासि विनटतां समाधि पायां लागे ।
यासी विनवितां हाचि वरिआं गे वो ॥३॥
यासि करुं जातां सहजचि गोठी ।
स्वार्थ परमार्थ पुरुषार्थ लागे पाठीं ।
यासी जिवीं ध्यातां यासिचि पडे मिठी ।
या गीतीं गातां बहमांड पडे पोटीं वो ॥४॥
यासीं करोनि पुढें विचरों जनीं वनीं ।
यासी घेऊनि संगे बैसों वो भोजनीं ।
यासि निजवूनि निजो निजशयनीं ।
याचें संग सुख घेऊं अनुदिनीं वो ॥५॥
निळा म्हणे निजाश्रमीची सकळा ।
ऐशा आरजा गौळणी त्या बाळा ।
ध्यानीं मनीं जिवीं ध्यातां या गोपाळा ।
गेल्या विसरोनियां संसार सोहळा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यासी पाहतां वो हदयस्थ – संत निळोबाराय अभंग – १७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *