संत निळोबाराय अभंग

येकलें न कंठेचि – संत निळोबाराय अभंग – १७७

येकलें न कंठेचि – संत निळोबाराय अभंग – १७७


येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें ।
केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें ।
गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें ।
पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों ॥१॥
ऐसा लाघविया मायासूत्रधारी ।
येकला येकटाचि झाला नानाकरी ।
स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरीं ।
तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥
याचिये नाभिकमळीं जन्म चतुरानाना ।
याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा ।
याचिया महातेज हुताशना ।
येणेंचि पढवून वेद केला शहाणा वो ॥३॥
याचिया द्रावपणें समुद्रासी जळ ।
याचियां चपळपणें पवन हा चंचळ ।
याचिया अवकाशें आकाश पघळ ।
याचिया घृतिवळे अवनी हि अढळ वो ॥४॥
येणोंचि मेरुस्तंभ अचळ धरियेला ।
दिशादिग्पाळांसी येणेंचि ठाव दिधला ।
विधिविधानाचा शास्त्रा बोध केला ।
येणेंचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥५॥
भोगूनि अंगना हा बाळब्रम्हचारी ।
येकला जेथें तेथें सोळा सहस्त्रा घरीं ।
आम्हां तुम्हां भोगूनि अलिप्त मुरारी ।
निळा म्हणे ऐसा विवादति नारी वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येकलें न कंठेचि – संत निळोबाराय अभंग – १७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *