संत निळोबाराय अभंग

पशु पक्षी जीव श्वापदें – संत निळोबाराय अभंग – १८८

पशु पक्षी जीव श्वापदें – संत निळोबाराय अभंग – १८८

पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें ।
अवघीं कृष्णाकारें झालीं तयां ॥१॥
माडया उपरमाडया बैसती बैसणीं ।
नाना अलंकार लेणीं झाला कृष्ण ॥२॥
मनीं त्यांचे कृष्ण ध्यानी त्यांचे कृष्ण ।
श्रवणीं त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ॥३॥
निळा म्हणे कृष्णीं झाल्या कृष्णरुप ।
अवघ्या नामरुप क्रियासहित ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पशु पक्षी जीव श्वापदें – संत निळोबाराय अभंग – १८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *