संत निळोबाराय अभंग

नित्य श्रीहरीचें आठवितें – संत निळोबाराय अभंग – १९६

नित्य श्रीहरीचें आठवितें – संत निळोबाराय अभंग – १९६


नित्य श्रीहरीचें आठवितें गुण ।
वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण ।
ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण ।
करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥
येथे आलिये वो याचि निजकार्या ।
केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥
येथें आलिये वो याचि निजकार्या ।
केलीं कर्मे तीं मागील भोगाया ।
आतां घडती तीं याते समर्पाया ।
नाहीं भय त्या निजस्थाना जावया वो ॥३॥
वाचें असत्याचा नेदी लागों वारा ।
केलें सांडणें वो देह संसारा ।
चित्तीं विषयाचा मोडियला थारा ।
नाहीं गुंतलें या दंभ अहंकारा वो ॥४॥
संतीं सांगितलें केलें तें जतन ।
नाहीं आज्ञें त्याचें केलें उल्लंघन ।
मतमतांतरां नाहीं दिल्हें मन ।
ह्रदयीं धरिलें या हरीचें चिंतन वो ॥५॥
कांही ठाकलें तें केलें लोकहित ।
काया वाचा वो हें वेचुनीयां चित्त ।
नाहीं वंचूनियां ठेविलें संचित ।
काळ याचिपरि सारियेला वो ॥६॥
नित्य नवा वो हा आवडीचा दिवस ।
केला करुनियां कीर्तनी उल्हास ।
नाहीं गोवियेला कोठें आशापाश ।
निळा म्हणे वर्तोनि उदास वो ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नित्य श्रीहरीचें आठवितें – संत निळोबाराय अभंग – १९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *