संत निळोबाराय अभंग

पाहों गेलिया वो नंदाचा – संत निळोबाराय अभंग – १९७

पाहों गेलिया वो नंदाचा – संत निळोबाराय अभंग – १९७


पाहों गेलिया वो नंदाचा नंदन ।
नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन ।
जेथें उभा होता राजीवलोचन ।
भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो ॥१॥
दृष्टी तेथेंहि निवाली वो इंद्रियें सकळ ।
जालि तटस्थचि देखोनियां घननीळ ।
मुकुट विराजित कुंडलें वनमाळ ।
सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥२॥
शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी ।
देहुडा पाउलीं वो मुरली अधरीं ।
वाजवितां सप्तस्वर उमठती माझारीं ।
देखतां देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥३॥
वेधी वेधले वो ज्याचे विधाता हरिहर ।
इंद्र आदिकरुनी सकळहि सुरवर ।
सिध्द महामुनि योगी ऋषिश्वर ।
नारद तुंबरादी महानुभव थोर वो ॥४॥
तेंथे कोण पाड आम्हां मानवांचा ।
ज्यातें न पुरती स्तवितां वेद वाचा ।
नकळे महिमा वो याच्या स्वरुपाचा ।
नयनीं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥५॥
रुप नागर वो सुंदर गोजिरें ।
चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणिती नुपुरें ।
ऐकतां निजानंदा होतसे चेईरे ।
निळा म्हणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाहों गेलिया वो नंदाचा – संत निळोबाराय अभंग – १९७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *