संत निळोबाराय अभंग

माझें मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०१

माझें मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०१


माझें मजचि वो आतुडलें गुज ।
नाहीं आणिकांचे कामा आलें काज ।
सांडिली लौकिकाची बरें झालें लाज ।
तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥
पडिली गांठी या गुणसवें ।
एकनिष्ठ वो शरण जातां भावें ।
मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे ।
झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥
याचिलागीं म्या सोशिले गर्भवास ।
घेतले जन्म वो याचीच केली आस ।
नाहीं देखिले वो कोणाचे गुणदोष ।
म्हणेनि कृपावंत झाला हा परेश वो ॥३॥
जें जें अर्चिलें तें सुकृत याचिसाठीं ।
नाही वेंचिले वो जतन केलें गांठी ।
भोगी त्यागी वो याचि वरी दिठी ।
म्हणोनि आजि हा लाधले जगजेठी वो ॥४॥
धरिलें जन्म तें सार्थक झालें माय ।
भेटवूनी याशीं वो फळलें उपाय ।
चुकले अवघेचि अघात अपाय ।
म्हणोनि आलिंगन देती यादवराय वो ॥५॥
केलें ब्रीद वो साच येणें काळें ।
अनाथबंधु हे दीनाच्या दयाळें ।
केली कृपा वो पुरविले सोहळें ।
म्हणोनि निळा नित्य चरणावरीं लोळे वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझें मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *