संत निळोबाराय अभंग

माझी मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०२

माझी मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०२


माझी मजचि वो पडियली भुली ।
गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली ।
याची अणुमात्र पडतांचि साउली ।
वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥
आलें वाचें तेंचि करितें बडबड ।
नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड ।
मना आलें तैसा नाचतें धुमाड ।
नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥
नाहीं देखिलें तें येऊनि पडे दृष्टी ।
तेंचि उच्चारें वो येऊनि वाचे ओंठी ।
नेणोनि अनुभवा ज्ञानाची कसोटी ।
नेणों काय येऊनि सांठवलें पोटीं वो ॥३॥
वाचे अनिर्वाच्य येऊनि आदळे ।
ह्रदयीं वाउगेचि होताती सोहळे ।
उठिति स्फुर्तिचेचि क्षणक्षणां उमाळे ।
माझिये जाणिवेचें फोडूनि पेंडोळें वो ॥४॥
होतें तैसें तुम्हां निवेदिलें पांई ।
न कळे यावरी तुमचे कृपेची नवाई ।
ठेवाल जैसें तेथें रहावें ते ठायीं ।
कैची सत्ता आम्हां बोलावें तें काई वो ॥५॥
यावरी कराल तें तुम्हीं करा देवा ।
मीं तों नुरोनियां उरलें देहभावा ।
कांहिंचि नेणोनियां हिताहित तेव्हां ।
निळा म्हणे साक्षी तुम्हीचि या सर्वा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझी मजचि वो – संत निळोबाराय अभंग – २०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *