संत निळोबाराय अभंग

येऊनि जाऊनि करी – संत निळोबाराय अभंग – २०४

येऊनि जाऊनि करी – संत निळोबाराय अभंग – २०४


येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड ।
पुरवूनि सकलही अंतरींची चाड ।
नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड ।
ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥
धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी ।
ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी ।
करीतां काम काज दृष्टी यावरी ।
बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥
त्यांचा विकिला ऐसा रावें त्यांच्या घरीं ।
पडिलें काम काज तेंहि आपण करी ।
नवचे पळभरी त्या सांडूनियां दुरी ।
त्यांची न लाजोचि म्हणवितां कामारी वो ॥३॥
त्यांचा येवजाव सासुरें माहेर ।
झाला आपणाचि लेणें अलंकार ।
अवघें धन वित गोत परिचार ।
झाला नाम रुप दीर भावे वर वो ॥४॥
नेदी उरों त्या आणिक दुसरें ।
विण आपण वो सोयरे धायरे ।
गाई म्हशी पशु पोटींची लेंकुरें ।
झाला घरदार त्यांचे एकसरे वो ॥५॥
खाती जेविती ते भोग सकळही ।
झाला आपणाचि संचरोनि देहीं ।
नेदी आपपर ऐसें दिसों कांहीं ।
निळा म्हणे ऐसी ऐक्याची नवाई वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येऊनि जाऊनि करी – संत निळोबाराय अभंग – २०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *