संत निळोबाराय अभंग

याचिलागीं वो त्यजियलें – संत निळोबाराय अभंग – २०५

याचिलागीं वो त्यजियलें – संत निळोबाराय अभंग – २०५


याचिलागीं वो त्यजियलें भोग ।
याचिलागीं वो केले नाना याग ।
याचिलागीं वो अष्टांगादी योग ।
याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥
जन्माजन्मांतरी केली हे सूचना ।
याचिलागीं वो वसविलें निर्जना ।
भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥
याचिलागीं वो आसनीं शयनीं ।
केली निरंतर याचि चिंतवणी ।
बैसलें धरुनियां रुप निज ध्यानी ।
नामी नेमियेली नित्य याचे वाणी वो ॥३॥
याचिलागीं वो मंत्रजप केला ।
याचिलागीं वो वेदांत पाहिला ।
याचिलागीं वो निजधर्म आनुष्ठिला ।
याचिलागीं म्यां संसार त्यजिला वो ॥४॥
याचिलागीं हे नित्यज्ञान ।
केलें सायास ते याचि वो लागून ।
याचिलागीं नियमीं निरोधिलें मन वों ॥५॥
याचिलागीं मी झालीये उदास ।
सांडूनि आपुलिया परिख्याची आस ।
याचिलागिं याचा निजध्यास ।
धरिला निळा म्हणे निशिदिनी ध्यास वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचिलागीं वो त्यजियलें – संत निळोबाराय अभंग – २०५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *