संत निळोबाराय अभंग

येणे आपुलिया कुपेची – संत निळोबाराय अभंग – २०६

येणे आपुलिया कुपेची – संत निळोबाराय अभंग – २०६


येणे आपुलिया कुपेची गुणें ।
माझीं पोशिली वो सर्वागजीवनें ।
देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें ।
यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥१॥
माझें जीवींचा हा जिवलग सोयरा ।
यासी करुनि काय पूजावें उपचारा ।
जें जें कीजे तो तो उपाधी पसारा ।
कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥
करुनि पूजूं जंव मंत्र तंत्र जप ।
जंव हा शब्दातीत निर्गुण अरुप ।
कोण करु यासी न पवेचि वो तप ।
ध्यानीं ध्याता हा अरुपीं अरुप वो ॥३॥
यासि न पुरे वो जाणिवे जाणतां ।
यासी न चले वो शहाणीव करितां ।
नाना तर्कवाद यापुढें वृथा ।
आतां कोणा करुं उपचार तत्वतां वो ॥४॥
करितां योगाभ्यास न पवे ती सिध्दी ।
करितां नाना याग वाढती उपाधी ।
नित्यनित्यज्ञानें अभिमानाची वृध्दी ।
आतां कोण्या युक्ति तोषवूं कृपानिधी वो ॥५॥
ऐसें जें करुं म्हणे आपुलिये मतीं ।
तें तें सांडीं परतें न धरी हा हातीं येकचि आवडे या शुध्द भाव भक्ती ।
‍ निळा म्हणे वर्म दाविलें हें संती वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येणे आपुलिया कुपेची – संत निळोबाराय अभंग – २०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *