संत निळोबाराय अभंग

कावडी भरुनि आणिलीं – संत निळोबाराय अभंग – २१७

कावडी भरुनि आणिलीं – संत निळोबाराय अभंग – २१७

कावडी भरुनि आणिलीं क्षीरें ।
दहीं घृत सारें नवनीतें ॥१॥
आदनाचेही पर्वत आले ।
माजि ते केले मिश्रित ॥२॥
भोंवते गोपाळ मध्यें हरी ।
दाविती कुसरी नृत्याची ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदु ।
लोटला सिंधु क्षीराचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कावडी भरुनि आणिलीं – संत निळोबाराय अभंग – २१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *