संत निळोबाराय अभंग

शिंगे काहाळा मोहरीं पावे – संत निळोबाराय अभंग २२

शिंगे काहाळा मोहरीं पावे – संत निळोबाराय अभंग २२

शिंगे काहाळा मोहरीं पावे ।
नादें हेलावे अंबर ॥१॥
वाकी घागर्‍या तोडर पायीं ।
धावती गाई थाट पुढें ॥२॥
मोर कुंचे चांदिवे वरि ।
नाचती गजरीं हरिनामें ॥३॥
पढती ब्रीद्रें सवें निळा ।
बहुत गोपाळा आवडे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शिंगे काहाळा मोहरीं पावे – संत निळोबाराय अभंग २२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *