संत निळोबाराय अभंग

आतां मी पुसेन तें – संत निळोबाराय अभंग – २६६

आतां मी पुसेन तें – संत निळोबाराय अभंग – २६६


आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें ।
तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥
मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ ।
ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥
म्हणतो नंदाच्या पोसण्या ।
दारसुण्या दासाच्या ॥३॥
जेथूनि तुझें येणें तेथुनि आमुचें जीणें ।
जाशील तेव्हां जाणें तुजचि संगे ॥४॥
निळा म्हणे ऐकोनियां संतोषले हरी ।
म्हणती यारे यावरी खेळ खेळों ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां मी पुसेन तें – संत निळोबाराय अभंग – २६६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *