संत निळोबाराय अभंग

गोड माझी वाणी तुम्हीं – संत निळोबाराय अभंग – २७६

गोड माझी वाणी तुम्हीं – संत निळोबाराय अभंग – २७६

गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी ।
लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥
इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें ।
अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥
बहुत दिवस आस्था मनीं वाहिली हेचि ।
करावी तुमची सेवा-स्तुति निजभावें ॥३॥
निळा म्हणे चरणावरीं ठेविली डोई ।
अपराध ते माझे कांहीं मना नाणावें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोड माझी वाणी तुम्हीं – संत निळोबाराय अभंग – २७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *