संत निळोबाराय अभंग

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत – संत निळोबाराय अभंग – २८१

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत – संत निळोबाराय अभंग – २८१

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत ।
नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥
ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ ।
गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥
बुडती जहाजें वायूचिया संगे ।
परि दोष नलगे वायूसी तो ॥३॥
निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी ।
वर्ते सर्वांतरी अलिप्तपणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत – संत निळोबाराय अभंग – २८१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *