संत निळोबाराय अभंग

न मागों कांही तुम्हां – संत निळोबाराय अभंग – २८२

न मागों कांही तुम्हां – संत निळोबाराय अभंग – २८२

न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती ।
सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥
न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां ।
करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥
वसउनि संतसमुदाय भोंवते ।
गाऊं नाचूं प्रेमें आठवुनि तुम्हातें ॥३॥
निळा म्हणे ऐशापरी सारुं आयुष्य ।
करुनियां दास्य राहों तुमचे चिंतनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न मागों कांही तुम्हां – संत निळोबाराय अभंग – २८२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *