संत निळोबाराय अभंग

संत येताती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ३०८

संत येताती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ३०८


संत येताती सनकादिक ।
सोहळा पाहों तो कौतुक ॥१॥
चंद्रभागे निमज्जन ।
परिसों हरीचें कीर्तन ॥२॥
संतसज्जनांचिया भेटी ।
करुं स्वानंदाची लुटी ॥३॥
निळा म्हणे पंढरपुरीं ।
सेवूं काला वांटिती हरि ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत येताती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ३०८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *