संत निळोबाराय अभंग

मग बोले मंजुळा उत्तरी – संत निळोबाराय अभंग ३१

मग बोले मंजुळा उत्तरी – संत निळोबाराय अभंग ३१


मग बोले मंजुळा उत्तरी ।
मज न्या जी गोकुळाभिरी ।
ठेवुनी नंदयशोदेच्या घरी ।
तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥
ऐकोनी तयाचे उत्तर ।
वसुदेव विस्मित आणि चिंतातूर ।
म्हणे कैसा करावा विचार ।
बंधने गोविलें मजलागी ॥२॥
ऐशिया मोहें त्या कवळित ।
तंव तुटली बंधने झाला मुक्त ।
म्हणे आतां हा कृष्णनाथ ।
नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥
मग घेऊनियां निज बोधेशीं ।
आला वासुदेव गोकुळाशीं ।
देऊनिया त्या नंदापाशीं ।
म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥
जन्मलें देवकीचिये उदरीं ।
परि हे ठेवितां नये घरीं ।
अहं कंसाचे भय भारी ।
यालागी तुम्हां हें कृष्णापर्ण ॥५॥
ऐशिया उत्तरी बोलिला ।
बाळक त्यापाशी दिधला ।
उघडोनि नंदे जो पाहिला ।
तंव तो देखिला चतुभुर्ज ॥६॥
निळा म्हणे वोळलें भाग्य ।
घरां आले पुसत चांग ।
उध्दरावया सात्विक जग ।
केला वास तया घरी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग बोले मंजुळा उत्तरी – संत निळोबाराय अभंग ३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *