संत निळोबाराय अभंग

कोटी मदनाचा बाप – संत निळोबाराय अभंग ३२

कोटी मदनाचा बाप – संत निळोबाराय अभंग ३२


कोटी मदनाचा बाप ।
प्रभा फांकली तेज अमूप ।
भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप ।
नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥
मग याशोदेपाशीं आणिला ।
म्हणे हा वसुदेव दिधला ।
येरी म्हणे हा चोरियेला ।
कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥
वसुदेव सदाचा भिकारी ।
बंदी कंसाचिये चिरकाळ वरी ।
बालक सुलक्षण हा निर्धारी ।
असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥
येरु म्हणे आहे पोंटीचा ।
आत्मा जिवलगु हा आमुचा ।
नाहीं वो आणिका लोकांचा ।
म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥
येरो म्हणे आमुचें कन्यारत्न ।
याच्या पालटा न्या करा यत्न ।
कंसा पुसतांचि तया दाउन ।
चुकवा अरिष्ट सकळांचे ॥५॥
यावरी कृष्णातें निरवून ।
वसुदेव निघाला माया घेउन ।
पुढती बंधने पावला बंदिखान ।
विचित्र विदांन शक्तींचे ॥६॥
श्रीकृष्णदेवेसी अंतरावो ।
होतांचि प्राप्त झाला मोहो ।
अविद्यायोगें चिंताप्रवाहो ।
महार्णर्वी पडियेला ॥७॥
निळा म्हणे हिताहित ।
नाठवेचि कांही झाला भ्रांत ।
मायादेवाची हा प्रघात ।
झाला आप्त वसुदेवा ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कोटी मदनाचा बाप – संत निळोबाराय अभंग ३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *