संत निळोबाराय अभंग

वारकरी संत पंढरीसी – संत निळोबाराय अभंग – ३१६

वारकरी संत पंढरीसी – संत निळोबाराय अभंग – ३१६


वारकरी संत पंढरीसी जाती ।
सप्रेमें नामघोषें ॥१॥
लोटांगणी त्यांसी जाईन आवडी ।
ओवांळीन कुडी वरुनी पायां ॥२॥
धन्य केल वंश तारिले पातकी ।
डोलतां पताकी गगन शोभे ॥३॥
टाळ श्रुति वादयें मृदंगाच्या ध्वनी ।
क्रमिताती अवनी ब्रम्हानंदें ॥४॥
पढती ब्रिदावळी करिती जयजयकार ।
टाळीया अंबर सादु देत ॥५॥
निळा म्हणे माझे सखे विष्णुदास ।
जाती पंढरीस प्रतिवरुषीं ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वारकरी संत पंढरीसी – संत निळोबाराय अभंग – ३१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *