संत निळोबाराय अभंग

झाली भाग्याची उजरी – संत निळोबाराय अभंग – ३५०

झाली भाग्याची उजरी – संत निळोबाराय अभंग – ३५०

झाली भाग्याची उजरी ।
दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥
ठेविले तो कर कटीं ।
जेणें अवलोकिला दिठी ॥२॥
चंद्रभागे केलें स्नान ।
भक्तां पुंडलिकाचें दर्शन ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
प्राणी होईल तो निश्चयेंसी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झाली भाग्याची उजरी – संत निळोबाराय अभंग – ३५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *